हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजपर्यंत अनेकजण आपले नशीब आजमावण्यासाठी सिनेसृष्टीत विविध मार्गांनी विविध संकटाना सामोरे जाताना दिसले आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा बॉलिवूड जगतातील रुपेरी आणि स्वप्नांच्या दुनियेतील भयाण वास्तव समोर आले आहे. काम देण्याच्या बहाण्याने एका मॉडेलवर तब्बल नऊ जणांनी लैंगिक अत्याचार केला आहे. मुख्य म्हणजे या घाणेरड्या कृत्यात बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानीच्या नावाचा समावेश असून इतर ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नावांमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर कोलस्टन ज्युलियन याचाही समावेश आहे.
https://twitter.com/FansclubDisha/status/1399948837989457924
मुंबईतील एका मॉडेलने बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर कोलस्टन ज्युलियन आणि अभिनेता जॅकी भगनानी यांच्यासह अनेकांवर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. बांद्रा पोलीस ठाण्यात तिने ही तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्काराच्या कलमाअंतर्गत हा गुन्हा दाखल करत प्रकरणाच्या तपासाला वेगाने सुरुवात केली आहे. पोलिसांनी ३७६, ३५४ या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला असून मॉडेलने ज्या ९ लोकांची तक्रारीत नावे घेतली आहेत.
Former model lodges FIR against Jackky Bhagnani and 8 other Big Names From Bollywood in sexual harassment#JackkyBhagnani #News #Bollywood https://t.co/r9Kw7L7Nki
— viralentalks (@ViralEntalk) June 1, 2021
त्या सगळ्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या सगळ्यांना लवकरच अटकही केली जाण्याची शक्यता आहे. या नराधमांमध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर कोलस्टन ज्युलियन, क्वान एन्टरटेनमेंटचे संस्थापक अनिरबान ब्लाह, बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानी, निखिल कामत, शील गुप्ता, अजित ठाकूर, गुरुज्योत सिंग, कृष्णकुमार, विष्णू वर्धान इंदुरी यांच्या नावाचा समावेश आहे.
https://www.instagram.com/p/CJgan5NlDHD/?utm_source=ig_web_copy_link
पीडितेने आरोप केला आहे की, २०१४ ते २०१९ या कालावधीमध्ये तिला चित्रपटात रोल देतो असे सांगून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. चित्रपटात भूमिका मिळावी यासाठी ही मॉडेल कामाची संधी शोधत होती. याचाच फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्या आरोपींची तिने नावं घेतली आहे त्यामध्ये कोलस्टन ज्युलियन, अनिर्बान ब्लाहो, निखील कामतो, शील गुप्ता, अजीत ठाकूर, जॅकी भगनानी, गुरज्योत सिंग, कृष्ण कुमार आणि विष्णू इंदूरीक यांचा समावेश आहे असं आजतक या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या बातमीत सांगितले आहे. अभिनेता जॅकी भगनानीने वांद्रे येथे तर निखिल कामतने सांताक्रूझमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये, शील गुप्ताने अंधेरी येथील एका इमारतीत तिचा विनयभंग केला तर अजित ठाकूरने २०१८ साली विलेपार्ले येथील इमारतीत तिच्यावर बलात्कार केला असे तिने तक्रारीत म्हटले आहे.