BPCL मधील हिस्सा विकून सरकारला उभे करायचे आहेत 90 हजार कोटी रुपये, ‘या’ कंपन्यांनी लावली बोली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारत सरकार पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमधील 52.98 टक्के हिस्सा विकून केंद्र सरकारला 90 हजार कोटी रुपये उभे करायचे आहेत. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड खरेदीसाठी सध्या तीन कंपन्यांनी रस दाखविला आहे. दुसरीकडे, जर आपण भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर्सबद्दल बोललो तर BSE वर शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 0.54 टक्क्यांनी वाढून 383 रुपये प्रति शेअरवर बंद झाले. NSE वर त्याचे शेअर्स 0.37 टक्क्यांनी वाढून 382.50 रुपये प्रति शेअरवर बंद झाले. अशा परिस्थितीत तज्ज्ञांनी BPCL ची टारगेट प्राइस मिड टर्ममध्ये प्रति शेअर 500 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली आहे.

या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, BPCLच स्टॉक्स त्याच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचा बेंचमार्क असावा अशी सरकारची इच्छा आहे. त्याचबरोबर मिंटच्या वृत्तानुसार सरकारने आपल्या 52.98 टक्के भागभांडवलासाठी 90 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. ज्यामध्ये बीपीसीएलच्या मालमत्ताही सामील आहेत. त्याचवेळी या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, जर एखाद्याला असे वाटले की, केंद्र सरकार आपल्या शेअर्सच्या सध्याच्या किंमतींच्या आधारे केवळ बीपीसीएलमधील आपला हिस्सा विकेल, तर ते चुकीचे आहेत. कारण सरकार कंपनीच्या Asset Valuation कडेही पहात आहे

https://t.co/QRuHCoHys5?amp=1

45,000 कोटी केवळ मालमत्ता विक्रीद्वारे मिळतील
केंद्र सरकार आपल्या शेअर्सची तुलना बीपीसीएलच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या शेअर्सशी करत आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, बीपीसीएलकडे इतकी मालमत्ता आहे की, त्याची विक्री करून सरकार कंपनीच्या मूळ व्यवसायामध्ये छेडछाड न करता सहजपणे 45,000 कोटी रुपये जमा करू शकते. Emkay Global च्या एक्सपर्ट्सचे असे म्हणणे आहे की, देशातील रिटेल पेट्रोलियम प्रोडक्ट्समध्ये बीपीसीएलचा 20% पेक्षा जास्त हिस्सा आहे. बीपीसीएलचे 17,000 पेट्रोल पंप आणि गॅसच्या भांडवलाकडेही कंपन्यांचा विचार आहे. पेट्रोनेट एलएनजी (Petronet LNG) आणि इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (Indraprastha Gas Limited) व्यतिरिक्त मोझांबिक गॅसमध्येही (Mozambique gas) बीपीसीएलचे शेअर्स आहेत.

https://t.co/grMoq6O47l?amp=1

बीपीसीएलचे हे व्यवसाय गुंतवणूकदारांना आकर्षित करतात
त्याच वेळी, Elara Capital चे उपाध्यक्ष, गॅरा दीक्षित म्हणाले की, बीपीसीएलच्या शेअर्समध्ये दीर्घ मुदतीत सध्याची किंमत दुप्पट करण्याची क्षमता आहे. RIL-BP आणि इतर कंपन्यांमधील कराराच्या तुलनेत बीपीसीएलचे मूल्य 80,000 कोटी ते 1 लाख कोटी रुपये असेल. बीपीसीएलची मोठी रिफायनरी क्षमता आणि हायड्रोकार्बनची खाण व उत्पादनही गुंतवणूकदारांना आकर्षित करीत आहे. याव्यतिरिक्त, कंपनीचे इतर व्यवसाय जसे की, प्रोडक्ट पाइपलाइन, LPG, इंडस्ट्रियल फ्यूल, ATF इत्यादी देखील कंपनीचे मूल्यांकन वाढवते.

https://t.co/gj2hDZ4Q6t?amp=1

बीपीसीएल खरेदी करण्याच्या शर्यतीतील ‘या’ 3 कंपन्या
बीपीसीएलमधील 52.98% सरकारी भागभांडवल खरेदी करण्यासाठी मायनिंग क्षेत्रातील दिग्ग्ज कंपनी वेदांत ग्रुप (Vedanta Group) सह अमेरिकेच्या दोन खाजगी इक्विटी इन्व्हेस्टर्स फर्म (PE Investors Firm), अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट (Apollo Global Management) आणि आय स्क्वेअर कॅपिटलचे (I Squared Capital) युनिट थिंक गॅस (Think Gas) यांनी निविदा सादर केल्या आहेत. या दोन्ही खाजगी कंपन्यांनी बीपीसीएल खरेदीसाठी निविदा प्रक्रियेत उडी घेतल्याने कंपनीतील सरकारी हिस्सेदारी खरेदी करण्याची प्रक्रिया स्पर्धात्मक व उत्साहपूर्ण बनली आहे. यामुळे सरकारला जास्त किंमतीत बीपीसीएलचे मूल्यांकन करण्याची अपेक्षा देखील वाढली आहे.

https://t.co/Kf5U1WkqLt?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.