बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाण्यामध्ये (Buldana) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये खेळता खेळता गळफास बसल्यामुळे एका 12 वर्षांच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक म्हणजे, हा मुलगा आई वडिलांना एकुलता एक होता. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय घडले नेमके ?
बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील खामगाव या ठिकाणी हि दुर्दैवी घटना घडली आहे. पूर्वेश आवटे असे या 12 वर्षाच्या मुलाचे नाव आहे. पूर्वेश हा आपल्या घराच्या पाठीमागे नेहमी प्रमाणे खेळत होता. घटनेच्या वेळी तो घरामागे खेळण्यासाठी गेला. यावेळी तो खांबाला रुमाल बांधून खेळत होता. पण,अचानक त्याला गळफास लागला आणि जागेवरच बेशुद्ध झाला. हे सर्व पूर्वेशच्या आईने पाहिले त्यानंतर तिने आरडाओरडा करून घरातील सर्वांना मदतीसाठी बोलावले.
यानंतर पूर्वेशला गळफास लागलेल्या स्थितीतुन खाली उतरवण्यात आले आणि तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या अगोदरच पूर्वेशचा मृत्यू झाला होता. पुर्वेश आवटे हा मुलगा आपल्या आईवडिलांना एकुलता एक होता. पूर्वेशची आई घरकाम करते. तर वडील खाजगी कंपनीमध्ये काम करून नंतर भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करतात. यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे, 2 वर्षापूर्वी या दाम्पत्यच्या मुलीचा देखील मृत्यू झाला होता. त्यातच आता पूर्वेश निघून गेल्याने आवटे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा :
ICICI Bank कडून FD च्या व्याजदरात वाढ !!!
Home Loan : आता घर खरेदी करणे महागणार, LIC हाउसिंग फायनान्सकडून होम लोनवरील व्याजदरात वाढ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सुरक्षा वाढविली; आता ‘या’ दर्जाची पुरवली जाणार सुरक्षा
आमिरच्या मुलाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण; पडद्यामागे नव्हे तर पडद्यावर झळकणार ‘जुनैद’