मुंबई : ५५ वर्षीय डॉक्टरने केला २१ वर्षीय मॉडेलवर बलात्कार

0
53
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | येथील ५५ वर्षीय डॉक्टरने २१ वर्षीय मॉडेलवर बलात्कार केल्याने मुंबई शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी या डॉक्टरला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

या प्रकरणातील पिडीत तरुणी एका मालिकेसाठी काम करत होती. त्वचा रोगाची समस्या जाणवू लागल्याने तिने एका स्कीन डॉक्टर बद्दल विचारणा केली. तेव्हा तीच्या मित्राने आरोपी डॉक्टर सोबत या मॉडेलची ओळख करून दिली. त्यानंतर त्या डॉक्टरसोबत पिडीत तरुणीची ओळख वाढली. हा सर्व प्रकार २०१७ साली सुरु झाला. मात्र डॉक्टरने मैत्रीचा गैरफायदा घेत तरुणीवर बलात्कार केला. या प्रकरणासंदर्भात मागील काही दिवसात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्वचा रोगावर उपचार घेत असताना पिडीत तरुणीच्या गुप्तांगाचे फोटो डॉक्टरने काढले आणि बलात्कार केल्यानंतर ती पोलीसात जावू नये म्हणून तिला ब्लॅकमेल करू लागला. शेवटी त्या मुलीने धाडस करून त्या डॉक्टरच्या विरोधात पोलीसात तक्रार दिली. सध्या आरोपी डॉक्टरला न्यायालयाने १० मे पर्यत पोलीस कोठडी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here