हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आता कुठे सुरुवात झाली आहे. त्यात आता आयपीएलच्या १३व्या हंगामाची देखील घोषणा झाली. अशातच एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी एक वाइट बातमी आहे. आफ्रिकेच्या महिला संघातील तीन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. या तिन्ही खेळाडूंची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आफ्रिकेचा महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी ट्रेनिंग कॅम्पमध्ये घेण्यात आलेल्या खेळाडूंच्या करोना चाचणीत ही गोष्टी समोर आली.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने २७ जुलैपासून ट्रेनिंग कॅम्प आयोजित केला आहे. यात सहभागी होण्यासाठी आलेल्या दोन खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळल्या. एका सपोर्ट स्टाफचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून या तिघांना तातडीने कॅम्पमधून स्वतंत्रपणे क्वारंटाइन करण्यात आले आहे.
आफ्रिकेच्या बोर्डाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कॅम्पमधील दोन क्रिकेटपटू आणि एक स्टाफ यांना करोनाची लागण झाली आहे. या सर्वांना १० दिवसासाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. या तिघी ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभागी होणार नाहीत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in