पुणे । पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौक आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाण पूल पाडण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यासोबतच इथे एक दुमजली पूल देखील बांधण्यात येणार आहे. शासनाने हे पूल उभारण्यासाठी टाटा- सिमेन्स कंपन्यांसोबत करार करण्याचीही परवानगी दिली आहे. पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणास (पीएमआरडीए) मिळालेल्या या पर्वांगीमुळे लवकरच हे पूल पाडण्यात येतील हे स्पष्ट झाले आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्प सुरु करण्यासाठी हे दोन पूल अडथळा ठरत होते म्हणून पीएमआरडीए ने हे पूल पडण्याचा प्रस्ताव शासनाच्या नगरविकास खात्याकडे पाठविला होता. तसेच हे पूल पुणे महानगरपालिकेने बांधले असल्याने महापालिका प्रशासनाकडेही तसा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. शासनाने हे पूल पाडण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे. हे पूल संचारबंदीच्या काळात पडण्याची परवानगी द्यावी अशीही विनंती करण्यात आली आहे.
महापालिकेकडून पूल पाडण्यासाठी “ना हरकत प्रमाणपत्र” मिळणे खूप गरजेचे असल्यानेच तसा प्रस्ताव महानगरपालिकेकडे पाठविण्यात आला होता. दरम्यान पुण्यात मेट्रोचे काम सुरु आहे. काही ठिकाणी हे काम रखडलेले आहे. त्यापैकीच एक हे दोन पूल होते. शासनाकडून सकारात्मक निर्णय आल्याने लवकरच हे पूल; पाडण्याची प्रक्रिया पीएमआरडीए सुरु करण्याची शक्यता आहे. लवकरच तेथील दुमजली पूलाचेही काम सुरु होईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.