हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपालांना दोन पत्र पाठविण्यात आली आहेत. दरम्यान राज्यपालांकडून निवडीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या अनुषंगाने आज आज महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिह कोशारी यांची राजभवन या ठिकाणी जाऊन भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने तसेच अध्यक्ष निवडीबाबतचा प्रस्तावही सादर केला. तसेच अध्यक्ष निवड लवकर घ्यावी, अशी मागणी केली.
विरिमंडळाच्या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारच्यावतीने विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत बदल करण्यात आल्यानंतर त्याला भाजपकडून विरोध करण्यात आला. दरम्यान अध्यक्ष निवडीबाबत राज्यपाल निर्णय घेणार असल्याने आज महाविकास आघाडी सरकारच्या शष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली.
यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री छगन भुजबळ, एकनाथ शिंदे यांनी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिष्टमंडळाने अध्यक्ष निवडीबाबत राज्यपालांशी चर्चाही केली. तसेच त्यांच्याकडे प्रस्ताव दिला.