Tuesday, March 21, 2023

याला म्हणतात कार्यकर्ता…; उदयनराजेंचं काचेवर सोन्याने काढलं अनोखं चित्र अन् गायल गाणं

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज आणि सातारचे खासदार अशी ओळख असलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांचे चाहते, कार्यकर्ते त्यांच्यासाठी अनेक गोष्टी करत असतात. अशीच एक अनोखी गोष्ट साताऱ्यातील त्यांच्या एका कार्यकत्याने केली आहे. उदयनराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या कार्यकर्त्याने त्यांचे सोन्याच्या साह्याने काचेवर काढलेलं चित्र भेट दिलं आहे. तसेच लाडक्या राजासाठी छानसं गाणंही गायलं आहे.

- Advertisement -

भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. मात्र, त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे. साताऱ्यातील एका त्यांच्या कार्यकर्त्याने एक चित्र तयार केले असून त्यासाठी त्याने कुंदण ,पारा, सोन्याचा वापर केला आहे.

एका काचेवर तयार केलेले चित्र त्याने नुकतेच आपल्या लाडक्या राजाला भेट म्हणून दिले. यावेळी त्याने उदयनराजे भोसले यांच्या समोर एक गाणंही गायलं. यावेळी त्याचे आपल्याप्रती प्रेम पाहून व भेटवस्तू पाहून उदयनराजेही भारावून गेले.