हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मुंबई विमानतळाच्या रस्त्यांवरच प्रवाशांनी जेवण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत होता. या व्हिडिओची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने (DGCA) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईला तब्बल 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो (BCAS) कडूनदेखील 60 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे या प्रवाशांनी रस्त्यावर जेवण करणे मुंबई विमानतळाला चांगलेच महागात पडले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, नुकतीच इंडिगो च्या दिल्ली गोवा विमानाला अनेक तासांचा उशीर झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाल्याची घटना समोर आली होती. हे विमान पुढे जाऊन मुंबईकडे वळवण्यात आले होते. त्यानंतर विमानातील या सर्व प्रवाशांनी विमानतळावरील रस्त्यांवरच रात्रीचे जेवण केले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल झाला. अनेकांनी त्यानंतर मुंबई विमानतळावर जोरदार टीका केली. तसेच विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रवाशांसाठी जेवणाची सोय करायला हवी होती, असे देखील अनेकांनी म्हणले.
मुख्य म्हणजे, या सर्व प्रकाराची दखल घेत, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईला 30 लाख रुपयांचा तर नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोकडून 60 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबई विमानतळाला एकूण 90 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. दुसरीकडे इंडिगो मुळे प्रवाशांची झालेली गैरसोय पाहता त्यांना 1.20 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Video of passengers eating on the tarmac at Mumbai Airport | A total of Rs 90 Lakhs fine imposed on MIAL – Rs 60 lakhs by Bureau of Civil Aviation Security (BCAS) and Rs 30 lakhs by DGCA. https://t.co/vhanRbcC9d
— ANI (@ANI) January 17, 2024
याबाबतची माहिती देत डीजीसीएने म्हणले आहे की, या सर्व प्रकाराची कारणे दाखवा या नोटीसचे उत्तर 17 जानेवारी रोजी प्राप्त झाले होते. मात्र नोटीसमध्ये दिलेले उत्तर समाधानकारक नव्हते. त्यामुळेच हा दंड ठोठावण्यात आला आहे. मुख्य म्हणजे मुंबई विमानतळ हे 2007 च्या हवाई सुरक्षा परिपत्रक 04 मध्ये नमूद करण्यात आलेल्या जबाबदाऱ्या पाळण्यास अपयशी ठरले आहे. आता याचाच फटका मुंबई विमानतळाला बसला आहे.