Site icon Hello Maharashtra

अलिबागमध्ये PNP नाट्यगृहाला लागली आग, लाईव्ह व्हिडिओ आला समोर

Fire

अलिबाग : हॅलो महाराष्ट्र – अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाला भीषण आग (Fire) लागल्याची घटना काल घडली आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे (Fire) संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीत (Fire) नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीने काही क्षणात रौद्ररुप धारण केले.

संपूर्ण नाट्यगृहात आगीचा (Fire) भडका उडाला आहे. त्यामुळे दूर पर्यंत धुराचे लोट पसरले होते. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. नाट्यगृहात वेल्डिंगचे काम सुरू असल्यामुळे हि आग लागली असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.

सुदैवाने या आगीत (Fire) कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग (Fire) विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. हि आग एवढी मोठ्या प्रमाणात होती कि आगीचे लोट दूरपर्यंत पसरले होते. या आगीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
भाजपचे खासदार संजय काका राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांच्या गाडीत

छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भर बाजारात पाण्याच्या टँकरने जमावाला चिरडले

प्रेयसीने सोन्याची अंगठी मागितली म्हणून प्रियकराने तिची गळा आवळून केली हत्या

पोलीस घरच्या भांडणात लक्ष घालत नाही म्हणून एका व्यक्तीचा SP कार्यालयासोमर आत्मदहनाचा प्रयत्न