हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनिलियाचा वेड चित्रपट प्रसिद्ध झाला. त्यांच्या चित्रपटातील वेड लावलं गाण्याने सर्वांचंच मनं जिंकलं आहे. या गाण्याप्रमाणे एका हॉटेल मालकाला ‘वेड’ लागलं आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील नावारूपास येत असलेल्या नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे. तिचा जबरदस्त फॅन असलेल्या हॉटेल मालकानं असं काही केलं आहे कि त्याची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.
नृत्यांगणा गौतमी पाटील हिने लावणीतून सध्या तरुणाईला चांगलीच भुरळ घातली आहे. गौतमीचा कार्यक्रम म्हटलं कि हाऊसफुल्ल असा होतो. आता तर एका वेगळ्याचं कारणानं गौतमी पाटील चर्चेत आली ते म्हणजे तिच्या नावानं सुरू करण्यात आलेली थाली होय. गौतमी पाटीलचा चाहता असलेलया एका हॉटेलच्या मालकानं गौतमी पाटील हिच्या नावानं थाली सुरू केली. माढा तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावरील टेभुर्णी शहरातील गौतमी पाटील हिच्या हस्ते हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. तिच्याच नावाने हॉटेल मालकाने गौतमी स्पेशल थाळी सुरु केली आहे.
या स्पेशल थालीमध्ये अनेक पदार्थांचा समावेश करण्यात आलेला आहार. त्यामध्ये भेंडी फ्राय, मिक्स व्हेज, सलाड, स्पेशल दाळ फ्राय, चार बटर रोटी, गुलाब जामचा समावेश आहे. अशी स्पेशल गौतमी पाटील व्हेज थाली बनवण्यात आली आहे. २४० रुपये इतकी या थालीची किंमत ठेवण्यात आली असून गौतमी पाटील या लोककलाकाराच्या नावाने सुरु झालेली ही पहिली थाळी असावी. या थाळीमुळे हॉटेल मालक मालक महेश गोरे चांगळेच चर्चेत आले आहेत.