मुंबई | पुणे १०.७ अंश सेल्सिअस, गोंदिया, गडचिरोली १० अंश सेल्सिअस
पुणे : उत्तरेकडील वार्याचा जोर वाढल्याने राज्यात पुन्हा थंडीची चाहुल लागली आहे. पुण्यासह राज्यातील बहुताश शहरातील किमान तापमानात घट झाली आहे.
पुणे येथे आज सकाळी १०.७ अंश सेल्सिअस तर, पाषाण येथे १२, लोहगाव येथे १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील किमान तापमानात बुधवारी सकाळी घट झाल्याचे दिसून आले. विदर्भात किमान तापमानात घट झाली असली तरी मंगळवारपेक्षा काही ठिकाणी तापमानात किंचित वाढ झालेली दिसून येत आहे.
प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १०.७, लोहगाव १२, लोहगाव १३.४, परभणी ११.९, नांदेड १३, जालना १४.९, औरंगाबाद १२.६, सांताक्रुझ १८.६, कुलाबा २१, डहाणु १८.७, रत्नागिरी १९.२, सोलापूर १४.१, कोल्हापूर १७.३, उस्मानाबाद १४.४, सांगली १५.९, नाशिक ११.३, जळगाव १०.२, सातारा १२.९, बारामती ११.६, मालेगाव १३.२, जेऊर ११, अकोला १२.४, अमरावती १३.५, बुलढाणा १५.५, ब्रम्हपुरी १०.६, चंद्रपूर ११.८, गडचिरोली १०, गोंदिया १०, नागपूर १०.७, वर्धा ११.६, यवतमाळ १२.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.