नात्याला काळिमा ! दीड महिन्यापासून दीर करत होता भावजयीवर बलात्कार

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर झोपलेल्या चुलत भावजयीवर दिराने जबरदस्तीने बलात्कार केला आहे. हि घटना बीड जिल्ह्यातील केज पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. यामध्ये पीडित महिलेला घराच्या बाजूला ओढत नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण
केज तालुक्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत घराच्या बाहेर झोपलेल्या 25 वर्षीय चुलत भावजयीला घराच्या बाजूला ओढत नेत जबरदस्तीने इच्छेविरुद्ध बलात्कार केला. तसेच या घटनेची कुठे वाच्यता केली किंवा सांगितले तर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तुझा व्हिडिओ माझ्याकडे आहे. जर याबाबत कोणाला सांगितले तर हा व्हिडिओ गावभर पाठवेन. अशी धमकी देत त्याने वारंवार बलात्कार केल्याचे फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

त्याने 29 मे रोजी देखील पीडितेवर अतिप्रसंग केला होता. मागील दीड महिन्यांपासून तो दीर पीडित विवाहित चुलत भावजयीवर वारंवार बलात्कार करत होता. पीडितेला हे सगळे सहन ने झाल्याने तिने आपल्या पतीला हा सगळा प्रकार सांगितला. पीडित महिलेच्या पतीने त्याला जाब विचारला असता त्याने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर पती- पत्नीने थेट केज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पीडित महिलेच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात नराधमाविरुद्ध गु.र.नं. २७१/२०२१ भा.दं.वि. ३७६ (२)(एफ), ३७६ (२) (एन), ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात आद्यप आरोपीला अटक करण्यात आले नाही. मात्र या घटनेने संपूर्ण गावात खळबळ माजली आहे. गावात मुलगी सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित केला असून कायद्याचा धाक अशा नराधमांना दाखवणे गरजेचा आहे,अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.