हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) स्मारकाच्या दुरवस्थेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा विधान परिषदेत करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले कि, छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक संगमेश्वरमधील सरदेसाई वाड्यात तयार केले जाणार आहे. त्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या घोषणेसोबत त्यांनी शहाजी राजांच्या स्मारकाविषय भाष्य केले आहे.
फडणवीस यांची अधिकृत घोषणा –
मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) विधान परिषदेत सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज हे फक्त शौर्यवीर नाहीत, तर ते धर्मवीर अन स्वराज रक्षक सुद्धा आहेत. फडणवीस यांनी अधिकृत घोषणा त्यांच्या शौर्याची आठवण करून देणाऱ्या ओळीपासून केली , ती अशी कि , ‘देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था… महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था’ .
स्मारकाच्या विकासाबाबत भूमिका –
फडणवीस म्हणाले, “सरदेसाई वाडा हा संभाजी महाराजांचा शेवटचा वास्तव्य स्थान आहे आणि तिथेच त्यांना साजेसं स्मारक उभारण्यात येईल.” यासोबतच त्यांनी पाचाडमध्ये शिवसृष्टी उभारण्याची घोषणा केली आहे . तसेच यासाठी राज्यसरकार पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यातून असे स्पष्ट होते कि , या स्मारकाच्या पुनर्निर्माणासाठी राज्य सरकारचे चांगले प्रयत्न करत आहेत. या सोबतच कर्नाटकमधील शहाजी राजांच्या स्मारकाच्या दुरवस्थेवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. “कर्नाटकमधील शहाजी राजांच्या स्मारकाची स्थिती योग्य नाही. आम्ही त्या राज्याच्या सरकारशी संपर्क साधू आणि ते जर काही करत नसतील, तर आम्ही त्या स्मारकाचा विकास करू,” अशी भूमिका फडणवीस यांनी विधान परिषदेत मांडली.