लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कवर उभारावे; भाजप नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांचे भव्य स्मारक मुंबईतील शिवाजी पार्क येथे उभारण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.

पत्रात नेमकी काय आहे मागणी-

‘माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भारतरत्न स्वर्गीय लता दीदी यांच्यावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क, दादर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे शिवाजी पार्कवर त्याच जागी गानकोकिळा लतादीदी यांचे स्मृतीस्थळ उभारून त्याच्या स्मृती कायमस्वरूपी जतन कराव्यात अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.

लता मंगेशकर यांचे स्मारक व्हावे ही संपूर्ण देशाचीच नव्हे तर जगातील कोट्यवधी संगीतप्रेमी अन लता दीदींच्या चाहत्यांची मागणी आहे. तरी तातडीने त्यांच्या विनंतीचा, भावनेचा सन्मान करावा आणि त्याच ठिकाणी जगताला प्रेरणा देणारे स्मृतीस्थळ बनवावे’, अशी मागणी लतादीदींचा एक चाहता या नात्याने भाजपा आमदार राम कदन यांनी केली.