अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या घरी चालत होतं सेक्स रेकेट? ‘या’ माॅडेलने केले खळबळजनक आरोप

0
867
Sonakshi Sinha
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘दबंग’ आणि ‘राऊडी राठोड’ सारखे हीट चित्रपट दिलेल्या प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हिच्यावर आणि तिच्या कुटुंबियांवर एका प्रसिद्ध मॉडेलने गंभीर आरोप केले आहेत. सोनाक्षीच्या घरी सेक्स रॅकेट चालत असून आपले कौमार्य विकून सोनाक्षीला स्टार बनवले असल्याचा आरोप एका मॉडेलने केल्यामुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

https://www.instagram.com/p/BKNGG7jhILd/

प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी हिच्यावर अशा गंभीर आरोप करणारी प्रसिद्ध मॉडेल कोण असेल असा प्रश्न सर्वांना पडला असेल तर ती मॉडेल आहे बिग बॉस-5’मध्ये दिसलेली अभिनेत्री आणि सलमानसह त्याच्या भावांवर बलात्काराचा आरोप करणारी पूजा मिश्रा ही होय.

https://www.instagram.com/p/BR4WbWVAR-i/?utm_source=ig_web_copy_link

पूजा मिश्रा हिने नुकतीच एका ठिकाणी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी मिश्राने म्हंटले की, सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबाने आपल्यासोबत सेस्क स्कॅम केला. इतकेच नाही तर माझे कौमार्यही विकले. आणि त्यातून त्यांनी सोनाक्षीला स्टार बनवले.

मदतीचा घेतला गैरफायदा –

पूजाने दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे की, माझे वडील आयकर विभागामध्ये होते. त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी अत्यंत घनिष्ठ अशा प्रकारचे संबंध होते. त्यातुन सिन्हा यांनी माझ्या वडिलांनी कोट्यवधी रुपयांची मदतही केली. मात्र, कालांतरानंतर हे कुटुंब माझ्यामागे मागे हात धुवूनच लागले आहे. या कुटुंबाने मला बरबाद करून सोडले. इतकेच नाही तर या कुटूंबाने माझ्या वडिलांनाही विश्वासात घेतले. ते जेव्हा मुंबईत होते तेव्हा त्यांची भेट घेत त्यांचे ब्रेनवॉश केले आणि बॉलिवूडमध्ये फक्त वेश्या काम करतात असे सांगितले. मात्र आज त्यांचीच मुलगी येथे काम करताना दिसत आहे. खरं तर माझा पत्ता कट करण्यासाठी सिन्हा कुटूंबाने हा र्वव कट रचल्याचा आरोप पूजा हिने केला आहे.

काळ्या जादूचेही करायचे प्रयोग –

माझे वडील जेव्हा आयकर विभागाच्या नोकरीतून निवृत्त झाले. त्यानंतर मी पुण्यात स्थायिक झाले. मात्र, माझ्या मागे हात धुऊन लागलेल्या या सिन्हा कुटुंबाने खुलेआमपणे माझ्याविरोधात काम सुरू केले. व्हिडीओकॉन गेस्ट हाऊसमध्ये रहात असताना पूनम सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा माझ्यावर काळी जादू करायचे. त्यातून त्यांनी माझे 35 चित्रपटही चोरले असल्याचा आरोपही पूजाने केला आहे.

सलमान आणि बंधूंवरही बलात्काराचा आरोप –

सोनाक्षी सिंह व तिच्या कुटुंबियांवर आरोप करणाऱ्या मॉडेल पूजा मिश्रा हिने या अगोदर सुद्धा सलमान खान आणि त्याच्या भावांवरएक गंभीर आरोप केला होता. सलमान व त्याच्या भावाने आपला बलात्कार केल्याचे पूजाने म्हंटले.

पूजाने ‘हे’ केले आहेत गंभीर आरोप –

1) 2007 ते 2017 मध्ये मी लोखंडवालामध्ये राहत असताना कपडे चोरायचे आणि सोनाक्षीला घालून फोटो काढायचे.

२) बेशुद्धावस्थेमध्ये त्यांनी कौमार्य विकून पैसे कमावले आणि सोनाक्षीला स्टार केले.

३) दबंग-3 बनत होता तेव्हा मला लीड रोलसाठी घेण्याची चर्चा सुरू होती, परंतु या लोकांच्या राजकारणामुळे मला 6 महिने रिहॅब सेंटरमध्ये जावे लागले. तिथे मला गोळ्या आणि इंजेक्शन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here