GOLD PRICE: सोन्याच्या किंमतीत घसरण सुरूच; जाणून घ्या आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घट होत असून सोन्याची ही घसरण अजूनही सुरूच आहे. आज 4 मे रोजी मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात प्रतितोळा 176 रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या किंमतीत 86 रुपयांची घट झाली. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 51,430 रुपये आहे तर चांदी 62, 700 प्रति किलो आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -51,380 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,280 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,380 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

Leave a Comment