सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगलीमध्ये एका निवृत्त पोलिसाने नदीत उडी घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. त्यांनी कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या (suicide) केली. अशोक नामदेव कांबळे असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. गेल्याच आठवड्यात जिल्हा न्यायालयाने लाच घेतल्याप्रकरणी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून ते नैराश्यात होते.
काय आहे नेमके प्रकरण ?
2012 मध्ये तुंग (ता. मिरज) येथील लाकूड व्यापाऱ्याकडील कामगाराचा झाडे तोडताना खाली पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या कांबळे यांनी गुन्ह्यात सहकार्य करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केली होती. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 8 जानेवारी 2012 रोजी लाच स्वीकारताना सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारातच कांबळे यांना रंगेहात पकडले होते. यानंतर कांबळे यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करून त्यांची न्यायालयात सुनावणी सुरू होती.
शनिवार दि.16 रोजी न्यायालयात लाचप्रकरणी कांबळे यांना दोषी धरून एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. यामुळे कांबळे नैराश्यात गेले होते. यानंतर त्यांनी याच नैराश्यातून अंकली येथे पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या (suicide) केली. या घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन हेल्पलाईनच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू केली. अशोक नामदेव कांबळे यांचा मृतदेह सापडला नसून त्याचा तपास सुरु आहे. घटनेच्या दिवशी कांबळे यांनी अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलावर आल्यानंतर आपल्या मुलीला व्हिडिओ कॉल केला आणि आत्महत्या (suicide) करीत असल्याचे सांगत फोन बंद केला. या नदीच्या पुलावर कांबळे यांची चप्पल आढळून आली होती.
हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान
आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे
नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार