भंडारा हादरलं ! वाळू तस्कराच्या ट्रॅक्टरने शेतमजूर महिलेला चिरडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुरमाड़ी तुपकर या ठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये शेतीचे कामं आवरून घरी परत जात असलेल्या शेतमजूर महिलेला वाळू तस्करी (Sand smuggling) करणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे वाळू तस्करी (Sand smuggling) करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
दिशा सुरेश कांबळे असे या अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. या अपघातानंतर घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मुरमाडी/तूप परिसरातून चुलबंद नदी प्रवाहित होत असून पांढरी शुभ्र आणि बारीक वाळूची मागणी अधिक असल्याने तस्करी (Sand smuggling) ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातून अधिकाऱ्याच्या नजरेतून वाचण्यासाठी वाळू तस्कर वेगाने गाडी चालवत असतात त्यामुळे अनेक अपघात घडत असतात.

असाच प्रकार लाखनी येथे घडला असून पळसगाव येथील एका वाळू तस्कराचा (Sand smuggling) मालकीचा ट्रॅक्टर अवैध रेती भरून भरधाव वेगाने मुरमाडी/तूप कडून मोगराकडे जात होता. यावेळी दिशा कांबळे या काम आवरून घरी परत येत होत्या. तेव्हा येणारा ट्रॅक्टर हा अचानक अनियंत्रित झाला आणि त्याने दिशा कांबळे यांना जोराची धडक दिली. टॅक्टरची धडक बसल्यानंतर दिशा कांबळे या खाली कोसळल्या, आणि ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन चिरडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपी ट्रॅक्टर चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार