मध्य रेल्वेमध्ये सहा दिवसांचा मेगा ब्लॉक; मुंबईकडे जाणारी ‘ही’ रेल्वे रद्द 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद – रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. काही दिवसांसाठी जनशताब्दी रद्द करण्यात आली आहे. मध्य रेल्वेतील इगतपुरी येथील टिटोली यार्डातील तांत्रिक कामांमुळे मध्य रेल्वेने आज शनिवारपासून सहा दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

 

मेगा ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच काही लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या विलंबाने धावणार असल्यामुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

 

इगतपुरी जवळील मध्य रेल्वेच्या टिटोली यार्डात रेल्वे प्रशासनातर्फे 28 मे ते 1 जून या दरम्यान तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबई-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस 30 आणि 31 तारखेला सुरु होणाऱ्या स्थानकापासूनच पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. तसेच परतीची जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस 31 मे आणि 1 जून रोजी सुरु होणाऱ्या स्टेशनपासून पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

Leave a Comment