Wednesday, October 5, 2022

Buy now

ठरलं तर! ‘या’ दिवशी होणार शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

औरंगाबाद – छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा क्रांती चौकात बसवण्यात आला. या पुतळ्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पुतळ्याच्या अनावरण आवरून मागील काही दिवसांपासून जोरदार राजकारण सुरू आहे. त्यामुळे महापालिकेने आवरणाचा चेंडू शासनाकडे टोलवला होता शासनाने शिवजयंतीच्या दिवशी सकाळी अनावरण करण्याचे निश्चित केले आहे.

शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होईल. या संदर्भात महापालिका प्रशासनाकडून प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे. प्रशासन राज्य शासनाकडे अंगुलीनिर्देश करीत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने 19 फेब्रुवारी रोजी सकाळी अनावरणाची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुतळ्याच्या आजूबाजूला सौंदर्यीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. लवकरच या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा मनपा कडून करण्यात येणार आहे. अलीकडेच मनपा प्रशासन यांनी पुतळ्याची पाहणी केली. सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.