साताऱ्यात चक्क मुलींची तुफान हाणामारी ; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शाळा असो वा कॉलेज, मुलांच्या भांडण्याचा किंवा राडा केल्याची घटना आपण पाहिली असेल. पण मुलांप्रमाणेच मुली सुद्धा तुफान राडा करत आहेत असं जर आपण म्हणलं तर ते काही खरं वाटणार नाही. पण साताऱ्यात कॉलेज मधील मुली चक्क राडा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेज परिसरातील मुलींच्या भांडणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सायन्स परिसरात अकरावी व बारावीच्या गणवेशातील मुली एका मुलीला मारत असल्याचे वीडियोच्या माध्यमातून दिसत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी साताऱ्यामधीलच एका शाळकरी लहान मुलांचा असाच हाणामारी करतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यामुळे साताऱ्यात नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वाना पडला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.