लष्कराची गाडी दरीत कोसळली; 16 जवान शहीद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिक्कीम येथे भारतीय लष्कराच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात १६ जवान शहिद झाले असून ४ जवान जखमी झाले आहेत. उत्तर सिक्कीममधील जेमा येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.

अपघातग्रस्त वाहन सकाळी चतनहून थंगूच्या दिशेने निघाले होते. यावेळी जेमाकडे जाताना एका तीव्र वळणावर गाडी घसरून खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी अपघातानंतर तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. जखमी झालेल्या ४ जवानांना विमानाने हलवण्यात आले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केला आहे. उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या निधनाने खूप दुःख झाले. त्यांच्या सेवेबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल देश मनापासून कृतज्ञ आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो असे ट्विट राजनाथ सिंह यांनी केलं.