भंडारा : हॅलो महाराष्ट्र – आज सकाळी भंडारा जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिससमोरील राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारवर निंबाचे झाड (a tree fell on a running car) कोसळले. हि घटना आज सकाळी 8.45 वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने कारमधील (a tree fell on a running car) कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
सततच्या पावसाने राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेले इंग्रजकालीन विशाल निंबाचे झाड (a tree fell on a running car) अचानक कोसळले. त्याच वेळी या महार्गावरून एक कार जात होती. त्यावेळी त्या कारवरच झाड कोसळले (a tree fell on a running car). मात्र कारमधील कुणालाही कसल्याही प्रकारची इजा झाली नाही. विशेष म्हणजे सकाळच्या वेळी या परिसरात मोठी वर्दळ असते.
राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे अनेक वाहने याठिकाणाहून ये- जा करत असतात. या झाडाजवळच वाहतूक पोलीस उभे असतात. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे झाड कोसळल्यानंतर (a tree fell on a running car) मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूल वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन झाड रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम सुरु करण्यात आले.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?