हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – तेलंगणामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये जवळपास 100 तरुणांनी घरात घुसून 24 वर्षीय डॉक्टर तरुणीचं अपहरण (kidnapped) केले आहे. रंगा रेड्डी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी तरुणांनी मुलीच्या घराच्या बाहेर धुडगूस घालत गाड्यांची तोडफोड केली एवढेच नाहीतर या आरोपींनी मुलीच्या वडिलांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Ranga Reddy, Telangana | A woman has been kidnapped from her house at Adibatla. The woman’s parents alleged that around 100 youths barged into their house & forcibly took their daughter Vaishali away. The accused also vandalised the house. pic.twitter.com/qlJuwU3voE
— ANI (@ANI) December 9, 2022
अपहरण (kidnapped) करण्यात आलेली तरुणीचे नाव वैशाली आहे. ती पेशाने डॉक्टर आहे. तिचा नुकताच साखरपुडा ठरला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, आरोपींना पकडण्यासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या आरोपी तरुणांचा शोध घेत आहेत.
#WATCH | Ranga Reddy, Telangana | A 24-yr-old woman was kidnapped from her house in Adibatla y'day. Her parents alleged that around 100 youths barged into their house, forcibly took their daughter Vaishali away & vandalised the house. Police say, case registered & probe underway. pic.twitter.com/s1lKdJzd2B
— ANI (@ANI) December 10, 2022
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आम्ही पथकं विभागली असून सर्व बाजू तपासत आहोत. हा अत्यंत गंभीर गुन्हा (kidnapped) असून आम्ही सर्व परीने प्रयत्न करत आहोत. आम्ही पीडित कुटुंबाकडून सर्व माहिती घेतली असून सध्या त्यानुसार तपास सुरु आहे,” अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त सुधीर बाबू यांनी दिली आहे.
हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..