Friday, January 27, 2023

वादळी वारा व पावसाने वीज अंगावर पडून महिला ठार

- Advertisement -

सांगली | जत शहरातील विठ्ठलनगर येथे रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अंगावर वीज कोसळून तुळसाबाई यशवंत डोंबाळे या ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. जत शहरात रविवारी दुपारी 3 च्या दरम्यान सदर घटना घडली.

तुळसाबाई डोंबाळे या राहत असलेल्या विठ्ठलनगर पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सावंत मळ्यात शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेल्या होत्या.अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला.यावेळी लिंबाच्या झाडाखाली तुळसाबाई उभ्या होत्या. याचवेळी अंगावर वीज पडून त्या जागीच ठार झाल्या.

- Advertisement -

ही घटना समजताच माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे,युवक नेते विक्रम ढोणे, योगेश मोटे, नितीन साळे,पप्पू कांबळे, मेहबूब शेख आदींनी घटनास्थळी भेट दिली.सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले,शरद शिंदे,तलाठी रवींद्र घाडगे,कोतवाल सुभाष कोळी,पोलीस पाटील मदन माने -पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.या घटनेची जत पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group