नशा करताना झालेल्या वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
औरंगाबाद – रेकॉर्डवरील गुन्हेगाराला चाकूने भोसकून मारणारा आरोपी थेट जिन्सी पोलीस ठाण्यात पोहोचल्याची घटना मध्यरात्री घडली. यात जखमीचा रस्त्यावर जास्त रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती जिन्सीचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी दिली. शेख शाहरुख शेख अन्वर (17 वर्ष 6 महिने, रा. इंदिरानगर, बायजीपुरा, ग.नं. 30) असे मृताचे नाव आहे. हैदर खान उर्फ शारेख जाफर खान (22, रा. संजयनगर, ग.नं.सी 11) असे मारणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत शाहरुख आणि हैदर दोघे मित्र होते. रविवारी मध्यरात्री बायजीपुऱ्यातील सिकंदर हॉल समोरील सार्वजनिक रोडवर हैदरने शाहरुखवर सपासप चाकूचे वार केले. शाहरुखच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव झाला. दोघांच्या झटापटीत आरोपी हैदरच्याही पोटाला चाकू लागला. तो जखमी अवस्थेतच जिन्सी ठाण्यात पोहोचला. त्याचे कपडे, चप्पल रक्ताने भिजलेली होती. त्यास जिन्सी पोलिसांनी घाटी रुग्णालयात पाठवले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शाहरुखलाही पोलिसांनी रिक्षामधून घाटीत पाठवले. उपचार सुरू असताना शाहरुखचा काही वेळातच मृत्यू झाला.
मृताचा मामा पठाण जावेद पठाण खालेद यांच्या तक्रारीवरून उपनिरीक्षक अनंता तांगडे यांनी हैदरविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला. अधिक तपास निरीक्षक राजेश मयेकर करीत आहेत.

Leave a Comment