धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी हिंगोलीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा टांगणीला लागला आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील तरुण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी हिंगोलीच्या खंडाळा येथील मराठा युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याच भागामध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा झाली होती. या सभेमध्ये त्यांनी मराठा बांधवांना आत्महत्या करू नका, निराश होऊन जाऊ नका असे आवाहन केले होते. मात्र, या सभेचे दोन दिवस उलटून जाताच युवकाने आत्महत्या केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीच्या मौजे खंडाळा विठ्ठल दतराव गायकवाड या 26 वर्षीय युवकाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच गावामध्ये या घटनेमुळे खळबळ माजली आहे. मृत विठ्ठल हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये नेहमी सक्रिय राहिला होता. त्याने हिंगोलीत पार पडलेल्या जरांगे पाटील यांच्या विराट सभेत देखील सहभाग नोंदवला होता. या सभेत त्याने स्वयंसेवकाची जबाबदारी पार पाडली होती.

मात्र मराठ्यांना आरक्षण मिळत नसल्यामुळे तसेच, पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन देखील अद्याप बेरोजगार असल्यामुळे विठ्ठल गेल्या अनेक दिवसांपासून नैराशजन्य स्थितीत अडकला होता. अखेर शुक्रवारी विठ्ठलने टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्य संपून घेतले. ही घटना ग्रामीण पोलिसांना कळतच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सध्या ग्रामीण पोलीस या आत्महत्या मागे आणखीन काही वेगळे कारण आहे का? याचा तपास घेत आहेत.