हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhar Card हे सध्याच्या काळात महत्वाच्या डॉक्युमेंट्स पैकी एक बनले आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) 14 जूनपर्यंत आधार ऑनलाइन अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. एका अधिकृत निवेदनात बुधवारी ही माहिती देण्यात आली. हे जाणून घ्या कि, याआधी आधार पोर्टलवर कागदपत्रे अपडेट करण्यासाठी लोकांकडून 25 रुपये फीस आकारली जात होती.
UIDAI च्या अधिकृत निवेदनानुसार, ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) रहिवाशांना आपली आधार कागदपत्रे ऑनलाइन मोफत अपडेट करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाखो लोकांना फायदा होणार आहे. 15 मार्च ते 14 जून, 2023 पर्यंत ही मोफत सेवा पुढील तीन महिन्यांसाठी उपलब्ध असेल.
आधार नोंदणी आणि अपडेट नियमावली, 2016 नुसार, आधार क्रमांक धारकाला आधार नोंदणीच्या तारखेपासून प्रत्येक 10 वर्षांनी किमान एकदा तरी आपली कागदपत्रे अपडेट करता येतील. या निवेदनात असेही म्हटले गेले की, फक्त आधार पोर्टलवरच ही सेवा विनामूल्य उपलब्ध आहे. मात्र आधार केंद्रांवर या आधीप्रमाणेच 50 रुपये आकारले जातील. Aadhar Card
आधार अपडेट करणे आवश्यक
आता लोकांना myAadhaar पोर्टलद्वारे किंवा जवळच्या आधार केंद्राला भेट देऊन ओळख आणि पत्त्याचा पुरावा अपलोड करून आपले आधार तपशील ऑनलाइन अपडेट करता येईल. UIDAI ने याबाबत एका ट्विटमध्ये म्हटले की, “विविध सरकारी आणि गैर-सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी आपले आधार डिटेल्स नेहमी अपडेट ठेवा. आधार अपडेट करण्यासाठीचे शुल्क. ऑनलाइन: 25 रुपये, ऑफलाइन: 50 रुपये.” Aadhar Card
अशा प्रकारे अपडेट करा आपले आधार डिटेल्स
UIDAI च्या माहितीत नुसार, आपल्याला सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल (SSUP) मध्ये आपला पत्ता ऑनलाइन अपडेट करता येईल. तसेच आधारमधील नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाइल नंबर, ईमेल तसेच बायोमेट्रिक्स अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल. Aadhar Card
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://uidai.gov.in/
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर