धोनी-कोहलीच्या नेतृत्वातील ‘या’ फरकामुळे माही यशस्वी झाला!

Dhoni And Virat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्यावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल हरल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या पराभवामुळे विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. विराटच्या नेतृत्वात लागोपाठ 3 आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, 2019 वर्ल्ड कप सेमी फायनल आणि आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये भारत पराभूत झाला होता. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने विराट कोहलीच्या अपयशाचे आणि धोनीच्या यशाचे कारण सांगितले आहे.

एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने विजय मिळवला होता. ‘धोनीने खेळाडूंमध्ये विश्वास निर्माण केला आणि त्यांच्यावर भरवसा ठेवला. त्याने टीममध्ये फार बदल केले नाहीत. हेच त्याच्या यशाचं श्रेय होते. धोनीने कोणत्याच खेळाडूमध्ये असुरक्षितता निर्माण करू दिली नाही,’ असे आकाश चोप्रा म्हणाले.

जर तुम्ही धोनीची टीम बघितलीत तर लीग स्टेजपासून ते नॉक आऊटपर्यंत त्याने टीममध्ये फार काही बदल केले नाही. धोनी एकच टीम घेऊन संपूर्ण स्पर्धा खेळायचा. त्याच्याकडे असे खेळाडू होते जे नॉक आऊटमध्ये देखील रन करायचे. जेव्हा तुम्ही क्वार्टर फायनल, सेमी फायनल किंवा फायनलमध्ये पोहोचता तेव्हा सगळ्यात कमी चुका करणाऱ्या टीम जिंकू शकतात. जी टीम संपूर्ण स्पर्धेत फार बदल करत नाही, त्या टीमच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास जास्त असतो,’ असे आकाश चोप्रा याने सांगितले आहे.