Aashram Season 3 : OTT वर बाबा निरालाच्या ‘आश्रम’ चा धमाका !!! अवघ्या 32 तासांत मिळाले 100 मिलियन views

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aashram Season 3 : ‘एक बदनाम: आश्रम 3’ या वेब सीरिजने रिलीज झाल्या पासूनच खळबळ माजवली आहे. होय, बाबा निराला यांच्या आश्रम 3 ला अवघ्या 32 तासांतच 100 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

Aashram Season 3 (MX Player) Actors, Cast & Crew » StarsUnfolded – Adrise  Digital

या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनपासूनच त्याला चाहत्यांची पसंती मिळाली होती. Aashram Season 3 चे पहिल्या दोन सीझनचेही प्रेक्षकांकडून खूप कौतुक करण्यात आले आहे. हे ध्यानात घ्या कि, ‘आश्रम’ ही भारतीय OTT वर सर्वाधिक पाहिली जाणारी सीरिज ठरली आहे. याच्या प्रत्येक सीझनमध्ये चाहत्यांना नवीन धक्का मिळत असल्याचे दिसून येते. आश्रमचे पहिले दोन सीझन देखील एकूण 160 मिलियन प्रेक्षकांनी पाहिले. तसेच, सीझन 3 चाही ट्रेलर रिलीज झाल्या नंतरच्या सहा तासांमध्ये हा शो YouTube वर नंबर 1 वर ट्रेंड करत होता.

It is here! 'Aashram Season 3' releases trailer and confirms release date |  India Forums

हे लक्षात घ्या कि, Aashram Season 3 या वेब सीरिजमध्ये बॉबी देओल, अदिती पोहनकर, चंदन रॉय सन्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, ईशा गुप्ता, सचिन श्रॉफ, अध्ययन सुमन, त्रिधा चौधरी, विक्रम कोचर, अनुरिता के झा, रुशद राणा, तन्मय रंजन, प्रीती सूद, राजीव सिद्धार्थ यांनी भूमिका केल्या आहेत.

Aashram Season 3 - आश्रम सीजन 3 के ट्रेलर रिलीज होने के बाद से लोगो में  इसके प्रति उत्सुकता और भी ज्यादा देखने को मिल रही हैं।

Aashram Season 3 रिलीज झाल्यापासूनच त्याची कथा आणि त्यातील पात्रांची सर्वत्र चर्चा होते आहे. आश्रम हा महान बाबा निराला यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा शो आहे. Aashram Season 3 मध्ये काशीपूरचा बाबा निराला हा आणखी विक्षिप्त आणि निर्भय झाला असल्याचे दाखण्यात आले आहे. तसेच सत्तेच्या लालसेने त्याला आणखी पिपासू बनवले आहे. त्यामुळे तो स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ आणि स्वतःला देव मानतो. यावेळी आश्रमाची पावर आणखी वाढली असल्याचे पहायला मिळते. हा बदनाम आश्रम महिलांचे शोषण, अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर कामं करत समाजात सत्ता आणि प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील दिसून येते.

Aashram 3 trailer released Will Baba Niralas secret be revealed web series  will release on 3 june | Aashram 3 Trailer: क्या खुलेगा बाबा निराला का राज?  3 जून को आएगा बाबा

या वेब सीरिजचे निर्माता आणि दिग्दर्शक असलेले प्रकाश झा सांगतात कि, “आम्हाला आश्रम आणि आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सर्व सीझनचा खूप अभिमान आहे. आश्रमला प्रेक्षकांनी पुन्हा एकदा आपले प्रेम दिले आहे आणि त्यांच्या प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत. आम्ही आमच्या दर्शकांचे त्यांच्या समर्थनाबद्दल आभार मानत आहोत.”

या वेबसाईटला भेट द्या :   https://www.mxplayer.in/show/watch-aashram/seasons/season-3-7187053803e10a7eaa49d31d8ebf4f40

 

हे पण वाचा :

Kapil Dev : ”जेव्हा धावांची गरज असते तेव्हा ते बाद होतात”, रोहित-कोहलीवर भडकले कपिल देव !!!

Multibagger Stock : ‘या’ मल्टीबॅगर शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला जोरदार नफा !!! 1 लाख रुपयांचे झाले 33 लाख रुपये

Business Idea : अशा प्रकारे फुलांच्या व्यवसायाद्वारे मिळवा भरपूर पैसे !!!

Gold Price Today : सोने-चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा

Bollywood : 2022 मध्ये अवघ्या 5 महिन्यात संगीत क्षेत्राने गमावले ‘हे’ 7 दिग्गज

Leave a Comment