Monday, January 30, 2023

AB Devilliers की Suryakumar Yadav? कोण आहे Best? शोएब अख्तर म्हणतो…

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) शतक मारले. सूर्याने चौफेर टोलेबाजी करत श्रीलंकन गोलंदाजांची पिसे काढली. सूर्यकुमार यादव ज्यापद्धतीने शॉट मारतो ते पाहता त्याची तुलना नेहमीच 360 प्लेयर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलिअर्स (AB Devilliers) सोबत केली जाते. मात्र सूर्यकुमार हा एबी डिविलियर्सपेक्षा पुढचा आहे असं मत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) म्हणाला आहे.

अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, सूर्यकुमार आणि बी डिविलियर्स यांच्यापैकी तो आधी सूर्याला त्याच्या संघात घेईल. यामध्ये कोणतीही शंका नाही की एबी डिविलियर्स हा क्लास प्लेयर आहे, परंतु सूर्यकुमार हा बिनधास्त आहे. म्हणूनच तो एबी डिविलियर्सपेक्षा 100 टक्के वरचढ आहे असं मत अख्तरने व्यक्त केलं.

- Advertisement -

दरम्यान, सूर्यकुमार यादवने श्रीलंका विरोधात तिसऱ्या टी-20 सामन्यात 51 चेंडूत नाबाद 112 धावांची दमदार खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ९ गगनचुंबी षटकार ठोकले. सूर्यकुमारचे हे टी-२० मधील हे तिसरे शतक ठरले . त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २० शटकात 5 बाद 228 अशी विशाल धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव अवघ्या १३७ धावांत आटोपला. या सामन्यातील विजयासह भारताने मालिकाही खिशात घातली.