व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अब्दुल सतार वर्षा भेटीवर … भाजप प्रवेशाची शक्यता

औरंगाबाद प्रतिनिधी /  काँग्रेसमधून बाहेर पडलेले अब्दुल सतार यांनी काल रात्री वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यांच्या या भेटीने अब्दुल सतार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

औरंगाबाद तिकीट वाटपावरून अब्दुल सतार नाराज झाले होते, त्यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून ते बाहेर पडले होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रसने आमदार सुभाष झाम्बड यांना उमेदवारी जाहीर केल्याने सतार नाराज झाले होते. लोकसभेच्या निवडणुकीत आपण अपक्ष लढणार असल्याचे सतार यांनी सांगितले होते.

अब्दुल सतार यांची रावसाहेब दानवे आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यासोबात काल चिखलठाणा विमानतळावर बैठक झाली. नंतर ते मुंबई ला रवाना झाले, त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता वर्तवली जात आहे.

इतर महत्वाचे –

या चोरांचं सरकार परत येऊ देऊ नका – प्रकाश आंबेडकर

पवारांनी ज्यांची कॉलर ओढली ; ती सीट आम्ही पाडली : रामदास आठवले