हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या टीईटीचा घोटाळा राज्यभर गाजत आहे. या घोटाळ्यात माजी मंत्री आणि शिंदे गटातील मोठे नेते अब्दुल सत्तार यांच्या एका मुलाचं आणि मुलीचं नाव समोर आले आहे. सत्तार यांच्या मुलांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत. याबाबत सत्तर यांनी प्रतिक्रिया दिली असून बदनामीसाठी हा सगळा कट रचण्यात आला आहे. आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई करावी. नसेल तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा, असे सत्तार यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वीच टीईटी परीक्षेतील 7 हजार 880 उमेदवारांची यादी समोर आली. परिक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या या यादीमध्ये हिना अब्दुल सत्तार आणि उझमा अब्दुल सत्तार या माजी राज्यमंत्र्यांच्या मुलींचीही नावं समोर आली आहेत. 102 आणि 104 क्रमांकावर त्यांची नावे असून सिल्लोडमधील एका संस्थेवर त्या दोघीही शिक्षिका आहेत. राज्यमंत्र्यांच्या मुलीच पैसे देऊन उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करत असतानाच निकाल होण्यापूर्वीच हा घोटाळा समोर आला.
या टीईटी घोटाळ्यात सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींचाही समावेश असल्याने पुढील कारवाई काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन दिवसांपुर्वी 2019 साली झालेल्या टी. ई. टी. अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचे पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झाले होते. त्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून या 7 हजार 800 बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्याची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे.