अब्दुल सत्तार बरळले; सुप्रिया सुळेंबाबत बोलताना केली शिवीगाळ

Abdul Sattar Supriya Sule
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील नेते तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. मंत्री सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवगाळी केली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही 50 खोके देऊ,” असे सत्तार यांनी म्हंटले आहे.

औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात होता. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी सुप्रिया सुळे यांनी पन्नास खोके संदर्भात वापरलेल्या शब्दाबाबत विचारणा केली असता. केलेल्या आरोपाबाबत सत्तार यांच्याकडे विचारणा केली. सुळे यांच्या आरोपावर सत्तार यांनी संताप व्यक्त केला. संतापाच्या भरात सत्तार यांची सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना त्यांची जीभ घसरली.

सत्तार यांना पुन्हा माध्यम प्रतिनिधींनी सुळेंना अशा प्रकारे शिवीगाळ का केली? असा प्रश्न केला असता सत्तार म्हणाले, “ते आम्हाला खोके बोलत आहेत त्यांचे डोके तपासायला पाहिजेत त्यासाठी सिल्लोडमध्ये एक दवाखाना उघडतो. या दवाखान्यात जे खोके खोके करत आहेत, त्यांचे डोके तपासावे लागतील. राजकारण हा भिकार धंदा आहे. आम्ही दररोज मतं मागतो, नगरपालिका, पंचायत समित्या, लोकसभा, विधानसभा हे मतांचे भीक मागणारे भिकारी नाहीत. यांचे पतीदेव उद्योगपती आहेत म्हणून यांना उद्योगपतीचा दर्जा द्यायचा का?” असा सवाल सत्तार यांनी केला.

अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी त्यांच्या विधानासंदर्भात संताप व्यक्त केला आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्तार यांच्यावर टीका केली जाऊ लागली आहे.

सत्तारांबद्दल सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटलं होतं की, पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? य़ावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करता आहात.