Thursday, March 23, 2023

अभिजित बिचुकलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; शिंदे गटात जाणार ??

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या सततच्या वक्तव्याने चर्चेत असणारे बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे. बिचुकले यांनी २०१९ विधानसभा निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या विरोधात लढवली होती त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र ही सदिच्छ भेट असल्याचे बिचुकले यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर अभिजित बिचुकले यांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतले होते. मात्र आता त्यांनी शिंदेंची थेट भेट घेतलं त्यांचे कौतुक केलं आहे. आपण शिंदे गटात जाणार का असा सवाल केला असता मी कोणत्याही गटात गेलेलो नाही, मी स्वतंत्र आहे . येत्या काही दिवसांत भूमिका मांडणार असल्याचं बिचुकले यांनी स्पष्ट केलंय.

- Advertisement -

मी साताऱ्याचा वैचारिक वारस आहे. माझी काही कामे आहेत , तक्रारी आहेत. लोकांची कामे अडलेली आहेत. त्या अनुषंगाने मी शिंदेंकडे आलो असं बिचुकले म्हणाले. मला पंतप्रधान व्हायचं आहे. महाराष्ट्रातून आजपर्यंत कोणीही पंतप्रधान झालेलं नाही पण मला व्हायचं आहे. ज्यांना ज्यांना माझी भूमिका आवडेल ते सर्व माझ्यासोबत येऊ शकतात असेही बिचुकले म्हणाले.