औरंगाबाद – शिवजयंतीनिमित्त क्रांतीचौक येथे शिवसेना आयोजित “शिवजागर महोत्सव” सुरू असून या निमित्ताने 3 दिवसापासून दररोज छत्रपती शिवरायांना अभिषेक सुरू आहे.
350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. त्यावेळी 21 नद्यांचे पाणी व दुधाने अभिषेक करून 16 सुवासिनींनी औक्षण केले होते. त्याच धर्तीवर तीन दिवसापासून “शिवजागर” महोत्सवात परिसरातील 21 नद्यांचे पाणी, दुधाने व 16 सपत्नीक जोडप्यांच्या हस्ते औक्षण केले जात आहे. राष्ट्रपुरुष आणि संत हे ईश्वरी अवतार मानले जातात त्यांचे स्मरण केल्याने आपल्या जीवनात स्फूर्ती व चैतन्य निर्माण होत असते याच उद्देशाने या ठिकाणी शिवरायांच्या कार्याचे स्मरण व्हावे, शिवरायांच्या विचारांचे स्मरण व्हावे व आजच्या तरुण पिढीने छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी केलेले कार्य स्मरणात ठेवून नुसते स्मरणार्थ न ठेवता ते आत्मसात ही करावे. आजच्या तरुण पिढीला याची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. यासाठीच याठिकाणी दररोज शिवरायांचाअभिषेक सोहळा होत आहे असे यावेळी शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले.
या अभिषेक सोहळ्यात शहरातील 16 सपत्नीक जोडप्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे चरण पूजन करून, दुग्धाभिषेक संपन्न झाला. यानंतर शिवरायांची सामुहिक आरती करण्यात आले यामुळे परिसरात एक भक्तिमय वातावरण तयार झाले होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र दानवे,प्रा.सुधाकर कापरे, प्रा.संतोष बोर्डे,प्रा. संतोष आढाव, प्रा.सचिन वाघ, प्रवीण शिंदे, विशाल गायके, नंदू लबडे आदींचे सहकार्य लाभले.