Sunday, June 4, 2023

दोन दुचाकींच्या धडकेत पादचारी नर्सचा गर्भपात

औरंगाबाद – चिखलठाण्याजवळ गुरुवारी रात्री झालेल्या एका विचित्र अपघातात एका पादचारी परिचारिकेचा गर्भपात झाला. ही परिचारिका खाजगी रुग्णालयात काम करते.

एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, दोन दुचाकी परिचारिकांना धडक दिल्याने या परिचारिकेचा गर्भपात झाला. हा अपघात 13 जानेवारीला रात्री नऊ वाजेच्या सुमारास जालना रोडवरील विमानतळाजवळ झाला. मुकुंदवाडी येथील एंडोवर्ल्ड हॉस्पिटल मधील दोन परिचारिका काम संपवून घराकडे पायी जात होत्या. त्यावेळी विचित्र पद्धतीने भरधाव वाहन चालवणाऱ्या दोन दुचाकी (एमएच 20 ईझेड 1981) आणि (एमएच 20 ईपी 0730) स्वारांनी परिचारिकांना धडक दिली.

या अपघातात एका परिचारिकेचा पाय फ्रॅक्चर होऊन गर्भातील नवजात शिशुचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, अधिक तपास सहायक निरीक्षक शिवाजी चौरे करत आहेत.