व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ट्रॅव्हल्सची आयशरला धडक; 2 जखमी

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील इंदोली फाट्यावर नविन ब्रिज जवळील सातारा ते कराड लेन वर आयशर आणि ट्रॅव्हल्स मध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये ट्रॅव्हल्स मध्ये असलेला एक पॅसेंजर आणि आयशर चालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, इंदोली फाटा नविन ब्रिज जवळ आज सातारा ते कराड लेन वरती आयशर चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात गाडी वरील ताबा सुटल्याने पुढे चालेल्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिली. अयशर गाडी रस्त्यावर फीरली असताच त्याच्या मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने अयशरला जोरात धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हल्स मधील एक पॅसेंजर जखमी झाला असून ओंकार संजय मांजरेकर (वय वर्षे 28) ,राहणार कोल्हापूर असं सदर जखमीचे नाव आहे. तर आयशर चालकाचे नाव शंतनू घाटे (वय वर्षे,38) असे असून त्यांना कराड येथे समिर केजळे यांच्या अॅब्युलेसने दवाखान्यात पाठवून दिले

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच हायवे पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा, समीर केजळे प्रकाश गायकवाड तसेच उब्रंज पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवून जखमींना रुग्णालयात पाठवले तसेच अपघाताची वाहने बाजूला काढून रस्ता सुरळीत केला.