उज्जैनहून देव दर्शन करुन परतणार्‍या ट्रेक्स गाडीला अपघात; 1 ठार तर 8 जण गंभीर जखमी

अमरावती | जिल्हातून जानारा बैतुल अकोला महामार्गावर आज पहाटे साडेपाच सहा दरम्यान टेम्पो ट्रॅक्स गाडी डिव्हायडरला आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अंजनगाव येथील काही भाविक भक्त श्रावण महीन्यानीमित्य उज्जैन येथील मंदिरातून दर्शन घेऊन परत येत असताना आज सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान हा अपघात झाला.

पांढरी जवळील दुभाजकाला एम एच १३ सी एस ८५७० ही चालक कुलदीप आवारे याचे वाहनावरील संतुलन सुटल्याने वाहन सरळ दुभाजकाच्या भिंतीला आदळले अपघात इतका भीषण होता की घटनास्थळावर राजु कतोरे याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर जखमींना जवळील अचलपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले.

सकाळच्या वेळी अपघात झाल्यामुळे कदाचित चालक थकल्याने त्याला डुलकी आली असावी व त्याचे नियंत्रण सुटले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सुदैवाने यात ईतर आठ जणांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. पुढील तपास पथ्रोट पोलिस करत आहेत.

You might also like