सांगली प्रतिनिधी । जिल्ह्यातील अडीचशेहून अधिक सोसायट्या तोट्यात आहेत. तोट्यातील सोसायट्यांची थकबाकी वसुलीसाठी अॅक्शन प्लॅन करण्याचा निर्णय जिल्हा बँक संचालक मंडळामध्ये घेण्यात आला. या बैठकीमध्ये कार्यकारीसह विविध पाच तांत्रिक समित्या गठित करण्यात आल्या. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची अध्यक्ष तथा आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी संचालक मंडळाची बैठक झाली.
या बैठकीला उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील, संचालक दिलीपतात्या पाटील, संग्रामसिंह देशमुख, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, सत्यजित देशमुख, वैभव शिंदे, राहुल महाडिक, मन्सूर खतीब, बाळासाहेब होनमोरे यांच्यासह संचालक तसेच कार्यकारी संचालक जयवंत कडू-पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या जिल्ह्यात सुमारे साडेसहाशे अधिक सोसायट्या आहेत. या सोसायट्या मार्फत शेतकर्यांना पीक कर्ज व विविध कर्ज पुरवठा करण्यात येतो. यातील अडीचशेहून अधिक सोसायट्याकडे मोठ्या प्रमाणात कर्जाची थकबाकी आहे यामुळे सध्या सोसायट्या अडचणीत आल्या आहेत.
या सोसायट्यांच्या थकबाकीच्या वसुलीबाबत संचालक मंडळामध्ये गांभीर्याने चर्चा करण्यात आली. व्यस्त तफावतीमधील सोसायट्यांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी संबंधित सचिव आणि बँक अधिकारी यांच्याच्यावर जबाबदारी निश्चित करण्यावरही चर्चा झाली. तसेच तोट्यातील सोसायट्यांच्या सचिवांची वर्गणी माफ करा किंवा अन्यत्र वर्ग करा, असे मत काही संचालकांनी व्यक्त केले. चर्चेअंती मार्चअखेर तोट्यातील सोसायटीच्या कडील जास्तीत जास्त थकबाकी वसुलीसाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.