हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – Honda कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Honda EM1 e हे मॉडेल लाँच केले आहे. इटलीतील एका आंतरराष्ट्रीय मोटरसायकल प्रदर्शनात या मॉडेलचे अनावरण करण्यात आले. कंपनी पुढच्या वर्षी ती भारतात लाँच करू शकते. ही इलेक्ट्रिक स्कूटर पहिल्यांदा युरोपियन मार्केटमध्ये लाँच करण्यात येणार आहे.
जपानी कंपनी होंडा (honda) युरोपियन बाजारपेठेनंतर ही स्कूटर भारतात लवकर लॉंच करणार आहे. Honda कंपनी पुढील दोन वर्षांत 10 इलेक्ट्रिक मॉडेल्स लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर अतिशय आकर्षक डिझाइनसह तयार करण्यात आली आहे. होंडानं (honda) प्रॅक्टिकल विचार ठेवून भविष्याच्या दृष्टीनं उपयुक्त ठरेल अशा डिझाइनची निवड केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर शहरातील छोट्या राइड्ससाठी डिझाइन करण्यात आली आहे.
काय आहेत या स्कुटरचे फीचर्स ?
या इलेक्ट्रिक स्कूटरला मोठा लगेज रॅक देण्यात आला आहे. तसेच तिला 10-इंचाचे मागील चाक देण्यात आले आहे. तसेच 12-इंच फ्रंट व्हील, फ्रंट डिस्क ब्रेक आणि टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स मिळतात. लाइटिंग ऑल-एलईडी आहे आणि इन्स्ट्रुमेंट कन्सोल एलसीडीदेखील या स्कुटरला बसवण्यात आले आहे. या स्कुटरमध्ये काढता येणारी बॅटरी बसवण्यात आली आहे. कंपनी (honda) याला मोबाईल पॉवर पॅक म्हणत आहे. MPP ही स्वाइपेबल बॅटरी आहे, जी घरच्या घरी चार्ज करण्यासाठी स्कूटरमधून काढली जाऊ शकते. हि स्कुटर एका चार्जवर 40 किमी पेक्षा जास्त धावू शकते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?