जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी अखेर अखेर भाजप मध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते भाजप मध्ये जाणार का अशा चर्चा रंगल्या होत्या. अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची ताकद अजून वाढली आहे.

तत्पूर्वी आज सकाळीच मिथुन चक्रवर्ती यांनी भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली होती. कैलास विजयवर्गीय हे मिथुन चक्रवर्ती यांच्या बेल्गाचिया येथील निवासस्थानी गेले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली. तेव्हा मिथुन चक्रवर्ती आज भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like