तुम्ही स्वतः शेतकऱ्यांसोबत बसा आणि…. प्रकाश राज यांचे पंतप्रधान मोदींना आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याला देशभरातील शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला असून केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांनी एकत्र येत भारत बंद पाळला होता. तर शेतकऱ्यांसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज एक दिवसाचा उपवास करणार आहेत. संपूर्ण देशभरातून शेतकऱ्यांना पाठिंबा मिळत असताचा अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक आवाहन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, शेती विषयक कायदे आपण रद्द करा. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत तुम्ही स्वत: बसा. त्यांच्या नक्की काय समस्या आहेत ते जाणून घ्या. तळगाळातील लोकांचं तुमच्याबद्दल, सरकारबद्दल आणि एकंदर कायद्याबद्दल नक्की काय मत आहे हे समजून घ्या. आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वास जिंका”, असा सल्ला प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी सारे एकत्र येत असल्याचे म्हटले आहे. तसेच, शेतकरी आंदोलन, शेतीविषयक विधेयके हे दोन हॅशटॅगही त्यांनी वापरले आहेत.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मात्र या शेतकरी आंदोलनात पाकिस्तान- चीनचा हात आहे अशी मुक्ताफळे उधळली आहेत. तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी या आंदोलनामागे शेतकरी नसून माओवाद्यांच्या आणि डाव्यांचा हात आहे असं विधान केले होते. या सर्व विधानांवरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर प्रचंड टीका होताना दिसत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment