मुंबई । पालघर जिल्ह्यात काही लोकांनी तीन प्रवाशांना चोर समजून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर ही संतांची नाही तर नराधमांची भूमी आहे. अस म्हणत अभिनेता सुमीत राघवन प्रचंड संतापला आहे. त्याने याबद्दल मीडियावर प्रखर प्रतिक्रियाही दिली. ‘मी सुन्न झालोय. जे घडलं ते अत्यंत भीषण, भीतिदायक, लाजिरवाणं आहे. अस ट्विट त्याने केल आहे.
सुमीतने सलग तीन ट्वीट केले. पहिल्या ट्वीटमध्ये तो म्हणाला की, ‘मी तो व्हिडिओ पाहिला नसता तर बरं झालं असतं. आता ती दृष्य माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीत. एखाद्या म्हाताऱ्या माणसाची जमाव दगडी मारून हत्या कशी करू शकतं. म्हाताऱ्याचं संरक्षण करण्याऐवजी पोलीस त्यांच्यापासूनच लांब पळत होते. आपण कुठे चाललोय हा प्रश्न आता माझ्या डोक्यात पुढील अनेक वर्ष घोळत राहणार आहे.
मी सुन्न झालोय.भीषण,भीतिदायक,लाजिरवाणं आहे जे घडलं. “संतांची,वीरांची भूमी” असं टाळूया आपण ह्यापुढे बोलायचं. “नराधमांची भूमी” जास्त योग्य आहे. ही घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेवर लागलेला काळा डाग आहे. @OfficeofUT @AUThackeray @AnilDeshmukhNCP
लाज वाटली पाहिजे @Palghar_Police
3/3— Sumeet (@sumrag) April 20, 2020
यानंतरच्या ट्वीटमध्ये त्याने लिहिले की, ‘जमाव इतका क्रूर आणि निर्दयी कसा असू शकतो. जमावातील एकानेही हे सर्व थांबवण्याचा प्रयत्न कसा केला नाही. मला वाटतंय की कोणी तरी केलाच असेल. बरोबर ना? मलला खरंच कळत नाहीये या सगळ्याकडे मी कशापद्धतीने पाहू.. जरा थांबूया.. विचार करूया आणि स्वतःलाच प्रश्न विचारूया.. जे झालं ते योग्य होतं का? असही ट्विट त्याने केल आहे.
WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”