Wednesday, February 1, 2023

अभिनेता योगेश सोहनीला अज्ञातांनी लुटले; मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर घडला प्रकार

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘मुलगी झाली हो’ यात शौनक नामक भूमिका साकारणारा अभिनेता योगेश सोहनी याला मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अज्ञातांनि लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या अज्ञातांनी योगेशकडून तब्ब्ल ५० हजारांची लूट केली असल्याचे समोर आले आहे. शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता सोमटणे एक्झिटजवळ ही घटना घडली. दरम्यान गाडीत योगेश एकटाच असून तो पुरता घाबरला होता. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे व सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

- Advertisement -

अभिनेता योगेश सोहनी आपल्या फोर व्हिलरने जात असताना शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता सोमटणे एक्झिटजवळ ही घटना घडली होती. एक्सप्रेस वे वरून पुण्याला जात असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधील एका ड्रायव्हरने योगेशला त्याची गाडी थांबवण्याचा इशारा केला. ते पाहून कुठलाही विचार न करता योगेशने तात्काळ आपली गाडी थांबवली. त्या ड्रायव्हरने योगेशला जाब विचारत ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे’ असे म्हटले. त्यामुळे एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. तुझ्यावर कायदेशीर तक्रार होऊ शकते. जर असे नसेल करायचे तर एक लाख पंचवीस हजार रुपये दे . आम्ही तुझ्याविरुद्ध कुठलीही तक्रार करणार नाही असे म्हणून योगेशकडे भरभक्कम पैशाची मागणी केली. दरम्यान गाडीत योगेश एकटाच होता आणि पुरता घाबरून गेल्यामुळे त्याला अन्य कोणतीही गोष्ट सुचली नाही.

दरम्यान त्या अज्ञात व्यक्तीने दमदाटी शिवीगाळ करून तिथल्याच एटीएममधून योगेशच्या खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतले. हातात पैसे मिळताच तो व्यक्ती ताबडतोब तिथून निघून गेला. आपल्यासोबत काहीतरी चुकीचे घडले आहे, असे वाटले म्हणून या सर्व घटनेचा संशय येताच योगेशने तात्काळ अपघात झालेल्या घटनांची माहिती घेतली. मात्र त्या दरम्यान कुठेही अपघात झाला नसल्याची माहिती त्याला मिळाली आणि आपली फसवणूक झाली आहे हे त्याच्या लक्षात आले. यानंतर त्याने सोमवारी शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या अज्ञात व्यक्तिविरोधात त्याने रीतसर तक्रारही नोंदवली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.