हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दसरा मोळाव्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या रोखटोख भाषणात भाजपसाहित कंगनावर नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात तुळसी वृंदावन आहे. गांजा नाही. गांजा पिकत असेल तर तुमच्या राज्यात आमच्या महाराष्ट्रात नाही. असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. तसेच घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर आहे म्हणणारा रावण आला आहे, असे उद्धव ठाकरे कंगनाला उद्देशून म्हणाले होते. उद्धव ठाकरेंच्या याच टीकेचा अभिनेत्री कंगना राणावतने समाचार घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. हिमाचलमध्ये सुपीक जमीन असल्याचं सांगत ती म्हणाली, ‘हिमाचलला देवांची भूमी म्हणून ओळख आहे. जास्तीत जास्त मंदिरे हिमाचलमध्ये आहेत. गुन्हेगारीचं प्रमाण देखील शून्य आहे असं ती म्हणाली.
Chief Minister you are a very petty person, Himachal is called Dev Bhumi it has the maximum number of temples also no zero crime rate, yes it has a very fertile land it grows apples, kiwis, pomegranate, strawberries one can grow anything here … cont. https://t.co/QumaLW7fbS
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 26, 2020
शिवाय हिमाचलची जमीन सुपीक आहे त्यामुळे या जमीनीवर सफरचंद, किवी, डाळिंब, स्ट्रॉबेरी पिकतात असं म्हणत तिने हिमाचलच्या जमीनीवर काय पिकतं त्याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’