हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आतापर्यंत असा एकही आठवडा गेला नसेल कि कंगना चर्चेत नाही. देशातील सद्यःपरिस्थती असो किंवा मग अन्य घडामोडी प्रत्येक गोष्टीवर कंगनाने आपले मत परखडपणे व्यक्त केले आहे. यामुळे अनेकदा तिला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले आहे. नुकताच कंगनाचा एक व्हिडीओ वायरल होतोय. फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्मवर जास्त काळ सक्रिय राहता येणार नाही असे म्हणत इतर पर्यायांचा विचार करत असल्याचे कंगना म्हणतेय. सोबतच इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये अनेक वर्षांपासून काय सुरू आहे याबाबतही ती व्यक्त झाली. तिचा हा व्हिडीओ अनेक जणांनी शेअर केला आहे. कौतुक म्हणून नव्हे तर ट्रोल करायचे म्हणून. अनेकांनी तर तुला काही काम नाहीत का अशीही विचारणा केली आहे.
https://www.instagram.com/tv/CO2ateDB87t/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट सस्पेंड केल्यानंतर ती इंस्टाग्रामवर जास्त सक्रिय दिसतेय. आपले मत व्यक्त करण्यासाठी ती इंस्टाग्रामचा पुरेपूर वापर करताना दिसत आहे. गंगा नदी किनारी तरंगणाऱ्या मृतदेहाच्या धक्कादायक प्रकाराबाबत व्यक्त होतानाचा कंगनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सोबतच या व्हिडिओत ती इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये अनेक वर्षांपासून काय सुरू आहे याबाबत बोलताना दिसली. कंगनाने तिच्या ऑफिशियल फेसबूक अकाउंट आणि इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. नेहमीच विविध कारणांनी ट्रोल होणारी कंगना या व्हिडीओमुळे पुन्हा ट्रोल झाली. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडिओवर विविध कमेंट केल्या आहेत आणि कमेंट्सच्या माध्यमातून तिला पुन्हा एकदा ट्रोल केले आहे.
अभिनेत्री कंगना रनौतच्या या व्हायरल व्हिडीओमुळे नेटकऱ्यांना त्यांचा संताप पुन्हा एकदा अनावर झाला आहे. त्यांनी कमेंट्समध्ये कंगनाला ट्रोल केले आहे. यात एकाने लिहिले कि, आता उत्तर प्रदेशला नायझेरिया म्हणा. तर अन्य एका युजरने म्हटले आहे, तुला बाकी काही काम नाहीत का?. तर काही नेटकऱ्यांनी लिहिले, “बॅंक ऑफ गंगामध्ये २००० मृतदेह नदीत तरंगताना अढळून आले, या प्रकरणावर आता नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा राजीनामा कंगना रणौतने मागितलाच पाहीजे.”