अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या स्माईलने भल्या भल्यांची झाली दैना; व्हिडीओ झाला व्हायरल

Rinku Rajguru
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सैराट चित्रपटातून आर्ची या भूमिकेमुळे अभिनेत्री रिंकू राजगुरू चांगलीच चर्चेत आली. त्यानंतर तिने आपल्या अभिनयासोबतच हटके अदांच्या जोरावर आपला वेगळा असा मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. सध्या ती सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच स्वतःचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओतील तिची स्माईल पाहून भले भले फिदा झाले आहेत. तिच्या चाहत्यांनी तर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तिच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे.

https://www.instagram.com/p/CPXkMd9p_Iv/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती अतिशय सुंदर अशी स्माईल देताना दिसत आहे. यात तिने मस्टर्ड रंगाचा टॉप परिधान केलेला आहे. सोबत तिचे मोकळे केस हवेमुळे उडताना दिसत आहे. तिने हा मोहक व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना हाय केले आहे. रिंकू राजगुरूच्या या व्हिडीओवर तिचे चाहते मोठ्या संख्येने लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. काही चाहत्यांनी फायरचे इमोजी शेअर केले आहेत. तर काहींनी हटके कमेंट्स केल्या आहेत. यातील एका युजरने आर्ची तू… अशी कमेंट केली आहे.

https://www.instagram.com/p/COCa5qXJ76t/?utm_source=ig_web_copy_link

सध्या लॉकडाऊनमूळे रिंकू अकलूजमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. रिंकूच्या कामाबद्दल सांगायचं तर, ती शेवटची अनपॉज्ड या चित्रपटात दिसली आहे. या चित्रपटात एकूण पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये ती दिसली होती. तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल म्हणायचं झालंच तर, मेकअप चित्रपटानंतर ती आता छूमंतर या मराठी चित्रपटात दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/CLeeRS_J6t6/?utm_source=ig_web_copy_link

या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवाय हिंदीत ती अमिताभ बच्चन यांच्यासह एका चित्रपटात दिसणार आहे. तर नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपटातदेखील ती झळकणार आहे. तसेच लॉकडाऊनपूर्वी तिने अमोल पालेकर यांच्यासह एका प्रोजेक्टचे शूटिंग पूर्ण केले.