हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बॉलिवूड क्षेत्रात जुन्या काळातील अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी खूप हिट चित्रपट दिले होते. या काळात खासकरून हिंदी चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्रींची साऊथ चित्रपटात खूप मागणी होती. यामध्ये खासकरून श्रीदेवीचे नाव आवर्जून घेतले जात असे. श्रीदेवीने अनेक साऊथ चित्रपटात काम केले. त्या काळात जसे श्रीदेवीचे चाहते होते तसेच रजनीकांत, कमल हसन, हेमा मालिनी यांचेही होते. त्यांच्याशी निगडित अशाच एका किस्स्याची आज खूप चर्चा होत आहे. तो म्हणजे अवघ्या 13 वर्षाची असताना श्रीदेवी आई झाली होती.
आज श्रीदेवी जरी आपल्यात नसल्या तरी त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका, गाणी आजही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांनी अनेक भूमिका साकारल्या. मात्र, वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी आईची भूमिका साकारणाऱ्या बहुदा त्या एकमेव अभिनेत्री असाव्यात. 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मंदरू मुदिचू’ या चित्रपटात श्रीदेवीने अवघ्या 13 वर्षाची असताना आईची भूमिका पार पाडली. विशेष म्हणजे रजनीकांत यांच्या सावत्र आईची भूमिका श्रीदेवी यांनी या चित्रपटामध्ये पार पाडली होती.
आपल्या कमी वयात श्रीदेवीने ‘मंदरू मुदिचू’ या चित्रपटामध्ये एका वयस्कर महिलेची भूमिका दमदारपणे साकारल्यानंतर तिच्या या भूमिकेचे चांगले कौतुक झाले. यामधील चित्रपटावेळी रजनीकांत हे श्रीदेवी यांच्यापेक्षा तब्बल 12 वर्षांनी मोठे होते. ज्यावेळी चित्रपट करण्यात आला. त्यावेळी श्रीदेवी 13 वर्षांच्या आणि रजनीकांत हे 25 वर्षांचे होते. या चित्रपटासाठी रजनीकांतपेक्षा श्रीदेवीनी त्याकाळी मोठी रक्कम घेतली होती.